मुंबईतील तिसऱ्या आणि पुणे मेट्रोचे २४ डिसेंबरला मोदींच्या हस्ते भूमिपूजन
पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाला अखेर मुहुर्त सापडला आहे. तसेच मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. यासाठी २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांच्याच हस्ते मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याचे संकेत आहेत.
मुंबई : पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाला अखेर मुहुर्त सापडला आहे. तसेच मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. यासाठी २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांच्याच हस्ते मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. दरम्यान, मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याचे संकेत आहेत.
गेल्या नऊ वर्षांपासून पुणे मेट्रोचा प्रश्न प्रलंबित होता. पुण्यातील मेट्रो इलेव्हेटेट असावी का भुयारी असावी यावरून गेले काही वर्षे वाद होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी सत्तेवर येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने राज्य शासनाला अहवाल सादर केला होता. हा अहवाल पुढे केंद्राला पाठवण्यात आला होता. केंद्र सरकारने २०१५ मध्ये याप्रकल्पाला मंजुरी दिली.
पुण्यातील स्वारगेट – पिंपरी चिंचवड असा १६ किमीचा मार्ग हा मेट्रोचा पहिला टप्पा आहे. तर वनाज – रामवाडी हा १४ किमीचा मार्ग मेट्रोचा दुसरा टप्पा आहे. या प्रकल्पासाठी ११ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दरम्यान, मोदी मुंबईतील मेट्रो प्रकल्पांचे भूमिपूजनही करतील. पुढील वर्षी राज्यात मुंबई, पुणे, ठाणे अशा महत्त्वाच्या महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर थेट मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्याची रणनिती भाजपने आखली आहे.