मुंबईतील जेलमध्ये भ्रष्टाचाऱ्यांनी बनवलं रेट कार्ड...
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईलचा मुक्त संचार झी 24 तासने उघड केल्यावर आता कुंपण राखणारेच भ्रष्ट झाल्याचं समोर आलंय. मुंबई विभागातल्या भ्रष्टाचाराही नमूना आता समोर आलाय. विशेष म्हणजे भ्रष्टाचा-यांनी आपलं रेट कार्डचं बनवलंय.
योगेश खरे, झी मीडिया, मुंबई : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईलचा मुक्त संचार झी 24 तासने उघड केल्यावर आता कुंपण राखणारेच भ्रष्ट झाल्याचं समोर आलंय. मुंबई विभागातल्या भ्रष्टाचाराही नमूना आता समोर आलाय. विशेष म्हणजे भ्रष्टाचा-यांनी आपलं रेट कार्डचं बनवलंय.
वाहतूक पोलीस असे पैसे घेताना आपण नेहमीच बघतो. पण हे पोलीस मात्र साधेसुधे पोलीस नाहीत. तर हे आहेत कुख्यात गुन्हेगारांना शिक्षा देणा-या जेलचे रक्षक...
झी 24 तासने नाशिकचं कारागृह अक्षरशः कॉलसेंटर बनल्याचं नुकतंच उघड केलं होतं. त्यानंतर 40 हून अधिक मोबाईल जेलमध्ये जप्त करण्यात आले. तीन वरिष्ठ जेलर्स या प्रकरणात निलंबीत झालेत.
यात अँड्रॉईड मोबाईल जेलमध्ये आणायचा असेल तर 25 हजार मोजावे लागतात. साधे मोबाईल जेलमध्ये आणायचे असल्यास 10 हजार रूपये असं रेटकार्ड असल्याचं बोललं जातं. चार्जिंग करायचं असेल तर 500 रूपये मोजावे लागतात.
हे झालं नाशिकचं... मात्र मुंबई विभागातल्या तुरूंगांमध्ये कैद्यांना प्रत्येक सुविधेसाठी लाच द्यावी लागते. हक्काच्या रजेपासून ते वैद्यकीय सुविधेपर्यंत नोटा मोजल्याशिवाय कुठलीही सुविधा दिली जात नाही. जेलच्या प्रवेशद्वारापासूनच याची सुरूवात होते. लाचलुचपत विभागाची भिती नसल्याने चार भिंतीत खुलेआमपणे पैसे स्वीकारले जातात. ठाणे, आर्थर रोड, तळोजा जेल... सर्वत्रच तुरूंगाची वरून दिसणारी ही पोलादी यंत्रणा भ्रष्ट कारभाराने पोखरलेली आहे.
राज्यामध्ये एकूण 38 विविध प्रकारचे कारागृह आहेत. यात मध्यवर्ती कारागृह 8 आहेत. गंभीर शिक्षा भोगणारे कैदी या जेलमध्ये आहेत. या भ्रष्टाचारामुळे श्रीमंत कैद्यांना शाही वागणूक मिळत असते. पोलीस कर्मचारी हापापल्याप्रमाणे हे पैसे स्वीकारून सुरक्षेशी तडजोड करतात. कैद्यांना तक्रार करण्याची कुठलीही सुविधा नसल्याने वर्षानुवर्ष काम करणारे हे कर्मचारी या भ्रष्टाचाराला सरावले आहेत. कारागृहात लावलेल्या सीसीटीव्हीत हा भ्रष्टाचार येत नाही हे विशेष.