मुंबई : पवई येथे हाऊस बोटमध्ये दारू पार्टी सुरू असताना दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन जण बेपत्ता झाले असून पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे. ही घटना रात्री सव्वा अकराच्या सुमारासची घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अनधिकृतरित्या पवई तलावात हाऊस बोटींग सुरू असून तिथं रात्रीच्या वेळेस बडे लोक पार्ट्या करत असल्याचा पर्दाफाश झी २४ तासने २ डिसेंबर २०१४ रोजी केला होता. त्यानंतर बीएमसीनं कारवाई करून मोठ़्या प्रमाणात हाऊस बोट सील केल्या होत्या. तरीही चोरून अलिकडच्या काळात हाऊस बोटींग सुरू झाले होते.


मध्यरात्री पवई तलावात एक हाऊस बोट बुडाली. हाऊस बोटीवर क्षमतेपेक्षा जास्त लोक होती. आठ लोक या हाऊस बोटीवर दारू पार्टी करत होती. बोट बुडाल्यावर पाच जणांना वाचविण्यात यश आलंय. तर बाकी तीन जणांचा शोध सुरू आहे. पवई तलावात हाऊस बोट अनधिकृतरित्या चालवत असल्याची तक्रार याआधीच स्थानिक नगरसेवक अविनाश सावंत यांनी केली होती.


मात्र बड्या लोकांच्या या हाऊसबोट पार्टीला नेहमीच बीएमसीच्या वरिष्ठ अधिका-यांनी पाठिशी घातलं होतं.  परिणामी बेकायदेशीर चालण्या-या या हाऊसबोट पार्टीमध्ये मध्यरात्री हि दुर्घटना घडली. झी 24 तासनं 2 डिसेंबर 2014 ला या अवैध हाऊस बोटींगचा पर्दापाश केला होता. मात्र तरीही चोरून येथे अलिकडच्या काळात हाऊस बोटींग सुरू होती.


मात्र, चोरुन पवई तलावात पार्टी सुरू होत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. पवई तलावात रात्री हाऊस बोट बुडाली घटनास्थळी फायर ब्रिगेड आणि पोलीस दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. या शोध मोहिमेच्यावेळी पाच जणांना वाचविण्यात आले. दरम्यान, तीन जण अजूनही बेपत्ता आहेत.