पाहा, प्रकाश मेहतांना प्रश्न विचारण्याचा कसा राग आला?
प्रकाश मेहता आणि त्यांचे काही कार्यकर्ते संबंधित पत्रकारावर धावून आले.
मुंबई : भाजपचे नेते आणि रायगडचे पालकमंत्री या नात्याने एका पत्रकाराने प्रकाश मेहता यांना, महाड अपघाताच्या घटनेवर प्रश्न विचारला, याचा प्रकाश मेहता यांना प्रचंड राग आला, यावेळी प्रकाश मेहता आणि त्यांचे काही कार्यकर्ते संबंधित पत्रकारावर धावून आले.
लोकांना कोणतीही माहिती मिळत नाहीय, यासाठी आपण पालक मंत्र्यांना प्रश्न विचारल्याचं संबंधित पत्रकाराने म्हटलं आहे.
याआधी प्रकाश मेहता यांच्यावर महाड अपघाताच्या वेळी नॉट रिचेबल असल्याचा आरोप आहे, यामुळे प्रकाश मेहता घटनास्थळी उशीरा पोहोचले, यानंतर त्यांचा सेल्फी काढताना कथित फोटोही सोशल मीडियासमोर आला आहे. यानंतर एका पत्रकारावर उद्दामपणा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात चर्चेत आलेला आहे.