आकाशातून वीज कोसळताना घ्यावयाची काळजी
सध्या वीज, वाऱ्यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून वीज पडल्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत.
मुंबई : सध्या वीज, वाऱ्यासह पाऊस पडण्यास सुरुवात झाली असून वीज पडल्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत.
वीज पडून होणारे मृत्यूचे प्रमाण वाढतच असून या नैसर्गिक आपत्तीवर आपण कोणत्याच प्रकारे नियंत्रण आणू शकत नाही.
मात्र वीजेबाबत सुरक्षिततेच्या प्रतिबंधक उपायांचा अवलंब केल्यास दुदैवी घटना टाळणे शक्य आहे.
आकाशातून वीज कोसळताना घ्यावयाची काळजी
मोबाईल बंद ठेवा किंवा वापर करू नका. छत्री त्वरीत बंद करा.
फोन, कॉम्प्युटर, टी.व्ही, मोबाईल यासारखी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बंद ठेवून प्लग बाहेर काढा.
वीज चमकतान झाडाखाली उभे राहणे अत्यंत चुकीचे आहे.
शेतात असाल तर शेताजवळील घरात त्वरीत आसरा घ्या.
आकाशात वीजेचा कडकडाट होत असताना घराबाहेर पडू नका.
धातुपासून बनलेल्या वस्तू जसे कृषी यंत्र, धातूची दांडी असलेली छत्री इत्यादीपासून दूर रहा.
वीजेच्या खांबाजवळ उभे राहू नका.
उंच जागेवर, झाडावर चढू नका.
खिडक्या, दरवाजे बंद ठेवा. सपाट पृष्ठभागावरती थांबा.
तळी, तलाव, विहिरीपासून अथवा पाण्याच्या सानिध्यात राहू नका.
वीज वाहक वस्तूपासून दूर रहा. उदा. रेडीएटर, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप.
विद्युत उपकरणे बंद ठेवा. पाण्याचे नळ, फ्रीज, टेलीफोन यांना स्पर्श करू नका.
नळ दुरुस्ती, खोदकाम यासारखी कामे बंद ठेवा.
वीजेचा कडकडाट होत असताना सुरक्षित ठिकाणी पोहचा.
पवनचक्की, पॉवरहाऊस, वायरिंगच्या कामापासून दूर रहा.
पाण्यात असाल तर तात्काळ बाहेर या.
कपडे सुकविण्यासाठी सुतळी अथवा दोरीचा वापर करा.
गाडीत बसला असाल तर गाडीतच बसा.
मोकळ्या मैदानात असाल तर खोल भागात बसा.
मजबूत असलेले पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे.