मुंबई : इंग्लंडचा प्रिन्स विलियम आणि त्यांची पत्नी केट मिडल्टन सध्या मुंबई दौ-यावर असून यावेळी त्यांनी ओव्हल मैदानावर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली तेंडुलकरची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विलियम आणि केट हे शाही जोडप प्रथमच भारत भेटीवर आलं असून क्रिकेटवेड्या देशात त्यांनी क्रिकेटचा देव असलेल्या सचिन तेंडुलकरची भेट घेणं पसंत केलं. यावेळी या शाही जोडप्यानं ओव्हल मैदानावर क्रिकेट मॅचेसचादेखील आनंद लुटला आणि सचिनशी क्रिकेटबाबत चर्चा केली. यावेळी माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकरदेखील उपस्थित होते.



केट मिडलटन आणि प्रिन्स चार्ल्स यांनी मुंबई दौ-या दरम्यान 26/11 च्या हल्ल्यातल्या ताज हॉटेलला भेट देत हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. केट मिटलटन आणि प्रिन्स यांचा हा दौरा आठवडाभराचा असणार आहे. या दौ-यादरम्यान ते मुंबईतील अनेक ठिकाणांना भेट देतील. यात स्लमडॉम मिलेनिअर या चित्रपटानं प्रकाशझोतात आलेल्या झोपडपट्टीचाही समावेश असणार आहे.. दौ-यादरम्यान ते आग्रा आणि दिल्लीलाही जातील आणि त्यानंतर भुतानला रवाना होतील.