मुंबई : मुळा खाण्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत, मूळव्याधवर मुळा हा रामबाण उपाय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळा खाल्ल्याने मूळव्याध असलेल्या रूग्णाला आराम मिळतो, थंडावा मिळतो, आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.


नियमित मुळा खाल्ल्यास लवकर फायदा


घरात सलाद म्हणून जेवताना खाल्ला जाणारा मुळा तुमच्या आरोग्यासाठी निश्चितच चांगला असतो.


मुळा हा पाईल्स म्हणजेच मूळव्याधवर उपाय तर आहेच, पण मूळव्याधी होणं थांबवण्याचं कामही मुळा करतो.


मूळव्याधचं स्वरूप वाढल्यास भंगदर, बवासीर सारखे भयंकर प्रकार समोर येतात. हे थांबवण्यासाठी मुळा खाण्याशिवाय साधा सोपा उपाय कोणताही नाही.


काही महिन्यात समस्या दूर


नियमित मुळा खाल्ला तर पाईल्सची समस्या काही महिन्यात दूर होते. मुळा रामबाण उपाय असला तरी डॉक्टरने दिलेली औषधीचं सेवन करणे सोडून देणे असाही त्याचा अर्थ नाहीय.


मात्र हा घरगुती उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्ही औषधांपासून दूर जाऊ शकता.


मुळा गुणकारी का?


मूळव्याधच्या रोग्यांना नेहमी मुळा खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण याच्यात लवकर मिळणारे फायबर्स असतात, फायबर्स मल मुलायम करतात, आणि पचनक्रिया तंदुरूस्त ठेवण्यात मदत करतात.


यात वाष्पशील तेलही असतं, जे पाईल्स असताना होणारा दाह कमी करण्यास मदत करतं आणि सूज कमी होते. तसेच मुळा थंडावा देण्याचं काम करतो आणि दाह कमी होतो.


कसा वापरावा मुळा


मूळव्याध असणाऱ्या लोकांना कच्चा मुळा खाल्ला पाहिजे. मुळा किसूनही तुम्ही खाऊ शकता. १०० ग्रॅम मुळ किसून १ चमचा मध मिसळून, दिवसातून दोन वेळेस खा.


यापेक्षा सोपा उपाय मुळ्याचा रस काढा, ग्लासभर रसात थोडसं मीठ टाका आणि दिवसातून दोन वेळेस प्या. पण कच्चा मुळा खाणं हा सर्वात प्रभावी आणि सोपा उपाय आहे.