मुंबई : पारदर्शकतेच्या मुद्यावरून शिवसेना-भाजपचा सुरू झालेला संघर्ष आता टोकाला पोहचलाय. पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप खासदार किरीट सोमय्यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा लक्ष्य केलंय.


आपली संपत्ती सर्व संपत्ती आपण वेबसाईटवर जाहीर केली आहे. त्यामुळं आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही त्यांची सर्व संपत्ती वेबसाईटवर जाहीर करण्याचं खुलं आव्हान सोमय्यांनी दिलंय. एवढंच नव्हे तर शिवसेनेतल्या काही बड्या नेत्यांनी अफरातफर केल्याचा खळबळजनक आरोपही सोमय्यांनी केलाय. तर सोमय्या स्वत: बिल्डर्सचे दलाल असल्याचा घणाघात शिवसेना खासदार राहुल शेवाळेंनी केलाय. सोमय्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.