बदलापूर: मध्य रेल्वे मार्गावर वारंवार होणाऱ्या समस्येमुळे बेजार झालेल्या संतप्त प्रवाशांनी बदलापूर स्थानकावर रेलरोको केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोजच्या ट्रेनला नेहमीच उशिर होत असल्याने प्रवाशांच्या संतापाच आज उद्रेक झाला. सकाळी ५ वाजल्यापासून स्थानकात प्रवाशांनी रेल रोको केला. 


प्रवाशांचं हे आंदोलन थांबवण्याचं आवाहन रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी केलं आहे. रेल्वेचे जीएम, डीआरएम आणि बाकीच्या अधिकाऱ्यांना बदलापूरला पाठवण्यात आल्याची माहिती सुरेश प्रभूंनी ट्विटरवरून दिली आहे.