रेल्वे स्टेशन मास्तरांचा ड्रेसकोड बदलणार
स्टेशन मास्तरांचा ड्रेसकोड बदलणार असून वाढीव अधिकार देखील मिळणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. नेहमीच पांढ-या कपड्यात दिसणारे स्टेशन मास्तर आता वेगळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसणार आहेत यासाठी फँशन डिझायनर रितु बेरी यांच्याशी चर्चा करुण स्टेशन मास्तरांना साजेसा नविन ड्रेस कोड तयार करणार असल्याचं सुरेश प्रभुंनी म्हटलंय.
मुंबई : स्टेशन मास्तरांचा ड्रेसकोड बदलणार असून वाढीव अधिकार देखील मिळणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलं आहे. नेहमीच पांढ-या कपड्यात दिसणारे स्टेशन मास्तर आता वेगळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसणार आहेत यासाठी फँशन डिझायनर रितु बेरी यांच्याशी चर्चा करुण स्टेशन मास्तरांना साजेसा नविन ड्रेस कोड तयार करणार असल्याचं सुरेश प्रभुंनी म्हटलंय.
नव्या ड्रेस कोड सोबतच स्टेशन मास्तरांच्या अधिकारांतही वाढ करणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलंय. देशभरातील स्टेशन मास्तरांच एक दिवसाच मुंबईमध्ये सम्मलेन होतं यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू उपस्थित होते. तसेच यावेळी सुरेश प्रभू यांनी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर विकासाची काय काम सुरु आहेत हे प्रवाशांना माहित पडाव यासाठी लवकरच प्रत्येक रेल्वे स्टेशनवर माहिती फलक लावणार असल्याच सांगितलंय.