मुंबई : पूर्व आणि पश्चिम उपनगरात रात्रभर दमदार पाऊस पडतोय. दादर, माटुंगा, सायन, जोगेश्वरी, वांद्रे, बोरीवली, ठाणे, डोंबिवली, कल्याण या परिसरात रिमझिम पाऊस सुरूच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थातच याचा परिणाम वाहतुकीवर न झाला तरच नवल... रात्रभराच्या मुसळधार पावसानं पश्चिम रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या वाहतूकीवरही परिणाम झालाय. डहाडूजवळ रेल्वे रुळावर पाणी आल्यानं बहुतांश गुजरातकडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या गाड्या उशिरानं धावतायत. दरम्यान घोलवड ते पालघर दरम्यान मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचंही समोर येतंय. शिवाय, यामुळेच पश्चिम रेल्वेनं चार गाड्या रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलाय. 


नवी मुंबईमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरात पावसाचा जोर दिसून आला. या पावसामुळे वाहतुकीवर काहीसा परिणाम दिसून आला. तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.