मुंबई : 'ऐ दिल है मुश्किल'च्या वादात मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित होणार हे स्पष्ट झालं... मनसेचा या चित्रपटाला असलेला विरोधही मावळला. याच विषयावर बोलण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली.


मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मनसेच्या आंदोलनाचा हा विजय आहे. आजपासून कुठल्याही चित्रपटांत भारतीय चित्रपटांत पाकिस्तानी कलाकार असणार नाहीत' असं म्हणत राज ठाकरेंनीही या चित्रपटाला असलेला मनसेचा विरोध मावळला असल्याचं जाहीर केलंय. 


पाक कलाकारांचा सहभाग असलेल्या चित्रपटांना विरोध दर्शवत मनसे चित्रपट सेनेनं आवाज उठवला. चित्रपट क्षेत्रात अनेकांना आज विषय समजू लागलाय. 'ऐ दिल है मुश्किल' बाबतीत मुख्यमंत्र्यांचा फोन आला. त्यांच्याशी बोलणं झालं... त्यांच्यासमोर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली, असंही राज ठाकरेंनी यावेळी म्हटलं.


...सिनेनिर्माते 'प्रायश्चित' करणार!


'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटाविषयी आम्ही आमची भूमिका मांडली. उरीतील शहिदांना श्रद्धाजंली अशी पाटी चित्रपट सुरू होण्यापूर्वी लावावी... तसंच यापुढे यापुढे पाक कलाकार घ्यायचे नाही, अशा अटी त्यांनी मान्य केल्या. शिवाय, पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असल्याचं प्रायश्चित म्हणून प्रत्येक प्रोड्युसरनं आर्मी वेल्फवेअर फंडला निधी द्यावा, हा मनसेच्या आंदोलनाचा विजय आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. 


अशी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडत बाकी कोणत्याही प्रश्नांना उत्तर न देता राज ठाकरे प्रेस कॉन्फरन्समधून निघून गेले.