मुंबई : महापालिका निवडणुकीच्या वातावरणात युती आघाडीच्या चर्चांना सुरुवात झाली असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी भूमिका मांडलीय. युतीबाबत प्रस्ताव आल्यास त्यावर नक्की विचार करेन असे महत्वाचे विधान त्यांनी झी 24 तास शी अनौपचारिक गप्पादरम्यान केले. मात्र ते स्वतः कुणासोबत युती करण्यास इच्छुक आहेत हे त्यांनी गुलदस्त्यात ठेवले. त्यामुळे आता युती आणि आघाडीच्या जागावाटप बोलण्या मध्ये रंगत वाढण्याची चिन्हे आहेत...


ठाकरे यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर काही वैशिष्ट्ये 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत राज ठाकरे यांचा 'एकला चालो रे' चा नारा.


- गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप सोबत युती तुटल्यावर शिवसेना मनसेची प्राथमिक स्तरावर युती बाबत बोलणी,  मात्र अचानक शिवसेनेकडून प्रतिसाद थांबवला.


- काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांची अचानक 'मातोश्री' वारी. उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या चर्चेचा तपशील अद्यापही गुलदस्त्यातच.



- अलीकडे राज ठाकरे यांच्या 'वर्षा'वर  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 3 गोपनीय बैठका.



- शिवसेना-भाजपचा जागावाटपाचा तिढा न सुटल्यास मनसे एक पर्याय किंवा दबावाचे राजकारण.