मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट हा आजचा चर्चेचा विषय ठरलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पुन्हा एकदा 'मातोश्री' सुखावली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चक्क वांद्यातील मातोश्रीवर दाखल झाले आणि ही भेट कौटुंबिक की राजकीय असे तर्क राजकीय वर्तुळात सुरू झाले.


पण, ही भेट कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर झाल्याचं सांगण्यात येतंय. बाळासाहेब ठाकरे यांची मुलं उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे यांच्यात कोर्टात वाद सुरू आहे.


बाळा नांदगावकरांची उपस्थिती... 


परंतु, उल्लेखनीय म्हणजे, राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले त्यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. 


मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी...


मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी राज - उद्धव ठाकरेंची ही भेट महत्त्वाची मानली जातेय. या भेटीनंतर अर्थातच मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षातील नेते थोडे सुखावले असतील... परंतु, या भेटीबद्दल भाजपची प्रतिक्रिया काय असेल? ही उत्सुकता लोकांना लागून राहिलीय.