मुंबई: वाढदिवसाच्या दिवशी अखंड महाराष्ट्राचा केक कापून श्रीहरी अणेंनी मोठा वाद ओढावून घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही श्रीहरी अणेंवर निशाणा साधला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचा केक कापून दोन तुकडे केलेला वाढदिवस अणे आयुष्यभर लक्षात ठेवतील असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. 


महाराष्ट्राची 4 राज्य करण्याची मागणी करणारे संघाचे माजी प्रवक्ते मा.गो.वैद्य यांच्यावर राज ठाकरेंनी गुढी पाडव्याला शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत टीका केली होती. राज्याचे तुकडे करायला तो काय केक आहे का असा सवाल राज ठाकरेंनी विचारला होता. 


आणि आता श्रीहरी अणेंनी महाराष्ट्राचा केक कापून या आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला आहे.