दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : युतीचा प्रस्ताव आला तर नक्कीच विचार करू असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी आपल्या विधानावरून अवघ्या 24 तासात घूमजाव केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना आणि भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळल्यावर युतीबद्दलच्या वक्तव्यासाठी राज ठाकरेंनी मीडियावर चुकीच्या बातम्या परसरवल्याचा आरोप केलाय. पत्रकरांनी प्रश्न विचारला.. त्यावर उत्तर दिलं...असं म्हणत मनात काहीही नसल्याचं राजनी म्हटलंय.


 



मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने दादर माहीम विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी वॉररुम तयार केलीय. त्याचे उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते होतंय. याप्रसंगी राज ठाकरे मनसेच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून लाईव्ह संवाद साधला. 


त्यावेळी राज ठाकरेंनी माध्यमांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. .याशिवाय भाजपवरही राज ठाकरेंनी जोरदार तोंडसुख घेतलं..भाजप इतर पक्षातून आलेल्या लोकांच्या जीवावर निवडणूका जिंकतंय...असा आरोपीही राज ठाकरेंनी केला.