मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात सुरु असलेल्या नीट परीक्षेच्या घोळाबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. नीटचा तिढा लवकर सोडवायला हवा असंही राज म्हणाले. 


दरम्यान, रविवारी संध्याकाळी आपण पंतप्रधान मोदींशीही याबाबत फोनवर बोलल्याची माहितीही यावेळी राज ठाकरेंनी दिली.


मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी राज काही वेळापूर्वी गेले होते. यावेळी राज यांच्यासोबत विद्यार्थी आणि पालकही उपस्थित होते.