मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हुतात्मा चौकात अभिवादनासाठी येणार होते. मात्र तब्येत ठीक नसल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीयेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अविनाश अभ्यंकर यांनी राज यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती दिली. यावेळी नितीन सरदेसाई आणि अभ्यंकर कार्यकर्त्यासमवेत हुतात्मा चौकात अभिवादनासाठी उपस्थित होते. 


आज राज ठाकरे येणार म्हणून अनेक कार्यकर्ते हुतात्मा चौकात मोठ्या संख्येने आले होते. पण राज ठाकरे आले नाही त्यामुळं त्यांचा हिरमोड झाला.