मुंबई : 'ऐ दिल है मुश्किल'ला विरोध करण्यासाठी पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंनी यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं आंदोलनाबद्दल भरभरून कौतुक केलंय. यावेळी आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीबाबतही आढावा घेतला.  


पुढच्या 48 तासात ऐ दिल है मुश्किलबाबत अधिकृत भूमिका स्पष्ट करू असं राज ठाकरेंनी पदाधिका-यांना सांगितलंय. व्हॉट्सअप सोशल नेटवर्किंग साईट्सवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही यावेळी राज यांनी केलीय. चित्रपटाला विरोध कायम असल्याचं या बैठकीनंतर अमेय खोपकर यांनी स्पष्ट केलंय.