मुंबई : राज्यात मार्चच्या अखेरपर्यंत सर्व म्हणजे सुमारे 52 हजार रेशनिंग धान्य पुरवठा दुकाने ऑनलाईन होणार आहेत. नाशिकच्या सुरगणा धान्य घोटाळ्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेशनिंग धान्य घोटाळा रोखण्यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला होता. आधार कार्ड किंवा रेशन कार्डवरील युनिक आरसीआयडी क्रमांकाच्या माध्यमातूनच धान्य मिळणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर 84 दुकाने चालू आहेत. मार्चपर्यंत हाच आकडा 52 हजार होणार आहे.


कोणत्या दुकानावर किती, कोणते धान्य, कोणत्या शिधाधारक ग्राहकाने घेतले याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.