मुंबई : रघुराम राजन यांचा गव्हर्नरपदाचा कार्यकाळ आज संपला आहे. राजन यांना आऱबीआयच्या स्टाफने उत्साहाने आज समारोप दिला. रघुराम राजन यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ चांगलाच गाजला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रघुराम राजन हे आणखी एक टर्म हवे होते, अशी अनेकांची अपेक्षा होती, मात्र कुणी निघून जा म्हणण्याआधी रघुराम राजन यांनी गव्हर्नरपदावरून काढता पाय घेतला.


गव्हर्नरपदावरून पायउतार होताना आता रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बॅंकेची स्वायत्तता कायम राहावी, यासाठी आघाडी उघडली आहे.


राजन कायम व्याजदर कपातीची मागणी करणाऱ्यांच्या टीकेचे लक्ष्य राहिले. कमी वेळात जादा दरकपात व्हावी, अशी लोकानुनयी मागणी असताना राजन यांनी मात्र, चलनवाढ पाहूनच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका घेतली. ही राजन यांची एक खासियत होती.


बुडीत कर्जामुळे बॅंकांचा बिघडलेला ताळेबंद सुधारण्यास त्यांनी प्राधान्य दिले. त्यांच्या रोखठोक कार्यपद्धतीमुळे आणि सरकारसमोर न नमण्याच्या वृत्तीमुळे त्यांना 'रॉकस्टार राजन' आणि 'जेम्स बॉंड' अशा उपाधी देण्यात आल्या आहेत. 


अशा उपाधींवर राजन सरळ उत्तर देणे टाळत असले, तरीही अप्रत्यक्षणपणे त्यांनीही याचा स्वीकार करत एकदा म्हटले होते की, 'माझे नाव राजन असून, जे ठरवितो ते मी करतोच.'


राजन आता पूर्ण वेळ शैक्षणिक क्षेत्रासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिकागो युनिर्व्हसिटीमध्ये वित्त विभागाचे प्राध्यापक म्हणून ते पुन्हा रुजू होत आहेत.


राजन यांनी सरकारबरोबर असलेले मतभेदही  लपवून ठेवले नाहीत. गव्हर्नरपदी आणखी काही काळ राहण्याची इच्छा आहे, मात्र, सरकारशी चर्चा फिसकटल्याने हे घडले नाही, असे देखील त्यांनी जाहीरपणे म्हटलं होतं.