मुंबई : बांधकाम व्यवसायाला शिस्त लावतानाच बिल्डरांच्या विस्कळीत आणि मनमानी कारभाराला चाप लावणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट अर्थात रेरा कायदा महाराष्ट्रात आजपासून लागू होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कायद्यामुळे ग्राहकांची होणारी फसवणूक थांबणार असून कोणीही उठून बिल्डर बनण्याच्या प्रकरालाही आळा बसणार आहे. 


त्याशिवाय या नव्या कायद्यातील तरतुदीमुळे बांधकाम व्यावसायिक ग्राहकांना अधिकाअधिक उत्तरदायी राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा यातून मिळेल.