मुंबई :  विद्या बालन हिच्या घरी नव्हे तर तिच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या मीरा पटेलच्या घरी डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या, असून त्यामुळेच डेंग्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जुहूतारा रोड इथल्या प्रणिती बिल्डींगमध्ये पाहणी केली.  या इमारतीत विद्या बालन आणि शाहिद कपूर राहतात. 


यावेळी बीएमसी कर्मचाऱ्यांना अभिनेता शाहिद कपर यांच्या बंद असलेल्या स्विमिंग पूलमध्येही अळ्या सापडल्या. तसेच मीरा पटेल यांच्या घरीही डेंग्यूच्या अळ्या सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 


या प्रकरणी शाहिद कपूरला बीएमसीनं  नोटीस बजावली आहे. आता शाहीद कपूर आणि मीरा पटेल यांना २ ते १० हजारपर्यंत दंड होवू शकतो.