मुंबई : गुगलवर hdfc phone banking number सर्च केलं तर मुंबईची प्रादेशिक भाषा ही गुजराती येत होती, पण ही चूक आता गुगलकडून दुरुस्त करण्यात आली आहे. गुगलवर hdfc bank phone banking number mumbai टाकल्यावर आता प्रादेशिक भाषा मराठी येत आहे. याबाबत एचडीएफसी बँकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकारामुळे अनावधानानं जर कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, असं एचडीएफसीकडून सांगण्यात आलं आहे. 24 तास डॉट कॉमनं याबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती. यानंतर ठाण्यामध्ये मनसेनं एचडीएफसी बँकेबाहेर मनसेनं आंदोलन केलं आणि बँकेच्या पोस्टरला काळं फासलं. 24 तासांमध्ये एचडीएफसी बँकेनं मुंबईची मराठी भाषा मराठी असा उल्लेख करा, अन्यथा खळ खट्ट्याक करू असा इशारा मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी दिला होता. 


मुंबईची प्रादेशिक भाषा मराठीच!




एचडीएफसी बँकेचं स्पष्टीकरण


सोशल मिडिया वरील काही पोस्‍ट्स मधून असे दिसून आले आहे की गुगल सर्च मध्ये ‘एचडीएफसी बॅंकेच्‍या मुंबईतील फोन बॅंकिंग नंबर’चा शोध घेतल्‍यास विसंगती दिसून येत होती. आम्‍ही तपासून पाहिले असता स्‍थानिक भाषा म्‍हणून 'गुजराती' असे गुगल सर्च मध्‍ये दिसून येत होते.


आम्ही हे अधोरेखित करू इच्छितो की मुंबईत फोन बॅंकिंगसाठी स्‍थानिक भाषेचा पर्याय मराठी हाच असून, आंम्‍हालाही हे कळू शकत नाही की गुगलच्‍या रिझल्‍ट्स मध्‍ये तसे का प्रतीत होत नव्हते. आम्‍ही तातडीने हे प्रकरण गुगलला कळवले व गुगलने तातडीने ही विसंगती दूर केली.


पहिल्या प्रमाणेच आमचे ग्राहक फोनबॅंकिंग क्रमांक ०२२ ६१६० ६१६१ द्वारे  पर्याय ३ निवडून, आमच्‍या फोन बॅंकिंग प्रतिनिधीशी मराठीत संवाद साधू  शकतील. यामुळे अनवधानाने जर कोणाच्‍या भावना दुखावल्‍या असतील तर आम्‍ही त्‍याबद्दल दिलगिरी व्‍यक्‍त करतो.