पश्चिम रेल्वेचा दिलासा, १५ डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढणार
लवकरच जारी होणाऱ्या लोकलच्या नव्या वेळापत्रकात पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वेळापत्रकात १५ डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढण्यात येणार आहेत.
मुंबई : लवकरच जारी होणाऱ्या लोकलच्या नव्या वेळापत्रकात पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या वेळापत्रकात १५ डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या वाढण्यात येणार आहेत.
जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरूवातीला 15 डब्ब्याचे दोन नव्या सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. शिवाय 15 डब्ब्यांच्या गाड्यांच्या सध्या 42 फेऱ्या होतात.
त्यात आणखी किमान 25 फेऱ्यांची वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव मान्य झाला, तर एकूण 15 डबा गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या 67वर जाणार आहे.