मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१६ (इ. १२वी)चा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य  माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत १२वीची परीक्षा घेण्यात आली होती.


येथे पाहा बारावीचा निकाल


१. www.mahresult.nic.in
२. www.result.mkcl.org
३. www.maharashtraeducation.com
४. http://maharashtra12.knowyourresult.com
५. www.rediff.com/exams
६. http://maharashtra12.jagranjosh.com



 


परीक्षेत प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय निहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील. तसेच माहितीची प्रत (प्रिंट) काढून घेऊ शकता.


तसेच उच्च माध्यमिक परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०१६चा निकाल एसएमएस सेवेद्वारे मोबाईल फोनवर उपलब्ध होईल.