खडसेंचे महसूल मंत्रिपद धोक्यात, मंत्रिमंडळ बैठकीला दांडी
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे महसूल मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. खडसे यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीला दांडी मारल्याचे दिसत आहेत. खडसे जळगावला पोहोचले आहेत.
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे महसूल मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. खडसे यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीला दांडी मारल्याचे दिसत आहेत. खडसे जळगावला पोहोचले आहेत.
जळगावमधील अनेक कार्यक्रमांना खडसे उपस्थित राहणार आहेत. सततच्या आरोपांमुळे स्वतः खडसेदेखील नाराज झाल्याचे दिसून येत आहे. खडसेंमुळे भाजप सरकारवर डाग लागत असल्यामुळे त्यांचं महसूलमंत्रिपद काढून घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यासाठी खडसे यांनी ही चाल खेळल्याचे बोलले जात आहे.
भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर आज महसूल मंत्री एकनाथ खडसे चांगलेच नाराज असल्याची माहिती समोर येतेय. आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीला खडसे अनुपस्थित आहेत. काल रात्रीच खडसें मुक्ताईनगरला रवाना झाले आहेत.
भोसरी एमआय़डीसीत पत्नीच्या नावे केलेली जमीन खरेदी खडसेंच्या चांगलीच अंगाशी येतेयं. काल दिवसभर त्यांनी मुख्यमंत्री आणि पक्षातल्या नेत्यांशी खडसेंची चर्चा सुरू होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचीही बैठक झाली. त्यानंतर येत्या मंत्रिमंडळ विस्तारात खडसेंचे पंख कापण्याची तयारी सुरू झाल्याचं बोललं जातंय याच पार्श्वभूमीवर खडसे नाराज असल्याचं बोललं जातयं.
दरम्यान नाराजी नसल्याचं समजावण्यासाठी जळगावातला पूर्वनियोजित कार्यक्रमांची यादीही सोशल मीडियावर पसरवण्यात येत आहेत.