निकृष्ठ रस्त्यांवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक, कंत्राटदाराला बदडलं
मुंबईतल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरुन मनसे आक्रमक झाली आहे.
मुंबई : मुंबईतल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांवरुन मनसे आक्रमक झाली आहे.
रस्ते कत्रांटदाराच्या कर्मचाऱ्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बदडून काढलं. उत्तर मुंबईतल्या कांदिवलीमधल्या समतानगर इथली ही घटना आहे.
मुंबईतल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांचा प्रश्न आधीच गाजत आहे. त्यातच गुरुवारी स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनीच रस्त्यांवरचे खड्डे बुजवण्यासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं गेल्याचं मान्य केलं होतं. तर रस्ते बांधकामातल्या भ्रष्टाचाराचा प्रश्न मनसेनं वेळोवेळी पालिकेत उपस्थित केला होता.
मात्र, अशा प्रकारे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराऐवजी, त्याच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्याच्या मनसेच्या कृतीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.