सचिन, धोनीलाही आवडली ही बिर्याणी
१९३८ साली सुरू झालेली वांद्रे येथील लकी बिर्याणीची चव खवैय्यांच्या तोंडी असते.
मुंबई : सचिन तेंडुलकर आणि एसएस धोनीलाही ज्या बिर्याणीने मोहिनी घातली त्या, बिर्याणीला आता ८० वर्ष पूर्ण होणार आहे. १९३८ साली सुरू झालेली वांद्रे येथील लकी बिर्याणीची चव खवैय्यांच्या तोंडी असते.
हैदराबादी आणि मोगलाई प्रकारच्या बिर्याणीसह अनेक प्रकारच्या बिर्याणीज येथे आहेत, पण लकीच्या स्पेशल रायताशिवाय ही चव अपूर्णच आहे. लकी बिर्याणीला सचिन आणि धोनीचा अभिप्राय आहे, शिवाय सेलिब्रिटीजनेही लकी बिर्याणीची वाह वा केली आहे.