अखेर, सचिन तेंडुलकरचं शिल्प हटवलं जाणार
मरिन ड्राईव्हवरील सचिन तेंडुलकरच्या गौरवार्थ बनवलेलं शिल्प (मेटल आर्ट पिस) काढून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.
मुंबई : मरिन ड्राईव्हवरील सचिन तेंडुलकरच्या गौरवार्थ बनवलेलं शिल्प (मेटल आर्ट पिस) काढून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात.
आरपीजी फाऊंडेशननं बनवलेला हा पीस काढण्यासाठी मुंबई पालिकेच्या ए वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी २४ तासांची मुदत दिली होती. उद्यापर्यंत आर्ट पीस हटवले गेले नाही तर पालिका प्रशासन स्वत: कारवाई करणार होती.
यापूर्वी आरपीजी आर्ट फाउंडेशनला हेरिटेज विभागानं याच संदर्भात नोटीस बजावली होती. त्यावर कार्यवाही न झाल्यानं पालिकेनं आदेश दिले होते. अखेर फाऊंडेशनने एक पाऊल मागे घेत आर्ट काढण्याची तयारी दाखविलीय
उल्लेखनीय म्हणजे, मरीन ड्राईव्ह हा परिसर ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला असून या परिसराचा युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थानांमध्येदेखील समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही बांधकाम करण्यास बंदी आहे.