मुंबई : मास्टर ब्लास्टर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने देवनार डंपिंग ग्राऊंडप्रकरणी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र पाठवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पत्राद्वारे सचिननं देवनार डंपिंग ग्राऊंडवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती केलीये.. या पत्रात मास्टर ब्लास्टरनं देवनार डंपिंग ग्राऊंडजवळ रहाणा-या रहिवाशांच्या व्यथा मांडल्यात. सचिननं शिवाजीनगरमधील कॉलनीलाही भेट दिली होती. त्यानंतर त्यानं ही परिस्थिती महापालिका आयुक्तांसमोर मांडण्याचं ठरवलं होतं.


कचरा डेपोला वारंवार लागणा-या आगीमुळे या परिसरातील रहिवाशांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. येथे रहाणा-या कुटुंबांना स्वच्छ पाणी, आरोग्य, सांडपाण्याचा निचरा, बँका, शाळा अशा सुविधा मिळतच नाहीत.


अनेक मुलांना सचिनने कच-याच्या ढिगा-यावर खेळताना पाहीलं. त्यामुळे व्यथीत झालेल्या सचिनने थेट पालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय. या आधी मुंबई उच्च न्यायालयानेही महापालिकेला देवनार डंपींग ग्राऊंवरुन फटकारलंय.


आता सचिनच्या विनंतीनंतर तरी महापालिका या समस्येकडे गांभिर्यानं लक्ष देईल अशी आशा इथल्या स्थानिकांना आहे..