मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घरासमोर बांधण्यात आलेलं पब्लिक टॉयलेट वादाच्या भोव-यात सापडलंय. बांद्रा पश्चिम येथील सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या काही अंतरावर बँडस्टँडला बीएमसीनं पब्लिक टॉयलेट बांधलंय. ज्याला सलमानचे वडिल सलीम खान आणि अभिनेत्री वहिदा रेहमान विरोध करत आहेत. 


टॉयलेटची जागा बदलण्याची मागणी महापौरांकडे केलीय. महापौरांनीही प्रशासनाला टॉयलेटची जागा बदलण्यास सांगितले पण प्रशासनाने लोकांची गरज लक्षात घेत त्याच ठिकाणी टॉयलेट बांधलंय.