मुंबईसह परिसरातील मिठागर जमिनीवर स्वस्त घरे बांधणार
मुंबई आणि परिसरातील मिठागरची जमीन आता स्वस्त घरं बांधण्यासाठी वापरली जाणार आहे.
मुंबई : मुंबई आणि परिसरातील मिठागरची जमीन आता स्वस्त घरं बांधण्यासाठी वापरली जाणार आहे.
आता या भागांतील मिठागरच्या जमीनीबाबत वस्तुस्थिती सांगणारा मास्टर प्लान तयार करण्याचे आदेश केंद्राने राज्य सरकारला दिलेत. राज्य सरकारतर्फे एमएमआरडीए हा मास्टर प्लान तयार करणार आहे.
यामुळे मुंबई आणि परिसरात किती मिठागरची जमीन आहे. किती ठिकाणी अतिक्रमण झालंय, खारफुटीची जमीन किती आहे, सीआरझेडच्या नियमाखाली किती जमीन आहे आणि यामुळे किती जमीन प्रत्यक्ष घरांसाठी उपलब्ध असेल या गोष्टी स्पष्ट होणार आहेत.
यामुळे भविष्यात मिठागरच्या जमिनीवर राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत घरं बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.