मुंबई : राज्यात मिठाचा तुटवटा नाही. मिठाचे दर कोठेही वाढलेले नाही. समाजकंठक अफवा पसरवत आहेत. जर कोणी अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर लोक एटीएम, बँक, पोस्ट ऑफीसमध्ये रांगा लावतांना दिसत आहेत. पण यानंतर एक वेगळीच अफवा पसरली, ती म्हणजे मीठ संपले. त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये लोकांनी मीठ खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मीठाचा मोठा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा पसरल्याने लोके महाग मीठ खरेदी करु लागले आहेत. मुंबईत कुर्ला, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागातही अशी अफवा पसरली.


दरम्यान, उत्तर प्रदेश आणि उत्‍तराखंडमध्ये अशी अफवा पसरली की अठरा रुपयाला मिळणार मीठ २०० ते ४०० रुपयाला विकलं जाऊ लागले. मुंबईतही हेच मीठ २०० ते ४०० रुपयाला काही ठिकांणी विकले गेले.


मिठाबाबत कोणीतरी अफवा पसरवली आहे. व्यापारीही जर सांगत असतील तर तुम्ही त्याचे बोलणे रेकॉर्ड करा आणि पोलिसांना द्या, त्यांच्यावर थेट कारवाई केली जाईल, असे मुनगंटीवार म्हणालेत. मुंबई आणि परिसरात मीठ तयार केले जाते. राज्यात मुबलक प्रमाणात मीठ आहे. त्यामुळे मिठाचा तुवटा नाही. जर कोणी कृत्रिमरित्या तुटवडा करत असेल तर कारवाई केली जाईल. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.