व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेत राजीनामा सत्र
शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना दैनिकात वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामनाचे अंक पेटवण्यात आले, उद्धव ठाकरे यांच्याकडे माफीची मागणी होत आहे.
मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेलं सामना दैनिकात वादग्रस्त व्यंगचित्र छापून आल्यानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सामनाचे अंक पेटवण्यात आले, उद्धव ठाकरे यांच्याकडे माफीची मागणी होत आहे.
मात्र सामनात छापून आलेलं व्यंगचित्र ही शिवसेना किंवा दैनिक सामनाची अधिकृत भूमिका नसल्याचं पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. तरी देखिल शिवसेनेत राजीनामा देण्याचं सत्र सुरूच आहे.
कारण बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, सिंदखेड राजाचे आमदार शशिकांत खेडेकर आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर यांनी उद्धव ठाकरेंकडे आपले राजीनामे पाठवले असल्याचं सांगण्यात येत आहे
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामध्ये मराठा मोर्चाला 'मुका मोर्चा' म्हणण्यात आल्यानं, मराठा समाजात तीव्र नाराजी दिसून येत आहे.