मुंबई :  मुंबई बॉम्ब स्फोटाप्रकरणी शिक्षा भोगून आलेला अभिनेता संजय दत्त याला नियमांपेक्षा अधिक सुट्टया मिळाल्या असल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


संजय दत्तला अतिरिक्त सुट्टी राज्य सरकारनेच दिली होती. संजय दत्तची अतिरिक्त सुट्टी गृहसचिवांनी केली होती मंजूर केली होती. या अतिरिक्त सुट्टी वादावर कोणावरही कारवाई नाही, असा खुलासा सरकारच्या प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे. 


एवढच नाही तर संजय दत्तने अतिरिक्त ५ दिवस सुट्टी घेतली होती हे ही झालं स्पष्ट झाले आहे. संजय दत्तचं फरलो आणि पॅरोलमध्ये पाच दिवस जास्त रजा वापरल्या आहेत, अशी माहिती राज्य सरकारने  हायकोर्टात  सादर केलल्या प्रतिज्ञापत्रात देण्यात आले आहे. 


प्रतिज्ञापत्रात फरलो घेतल्यानंतर तीन दिवस उशीरानं तर दोनदा पॅरोल घेतल्यावर दोन दिवस उशीरानं जेलमध्ये परत गेल्याचं उघड झाले आहे. 


दोन दिवसांची अतिरिक्त फर्लो प्रधान गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी माफ केल्याचं प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. 


पॅरोलमध्ये तारखांबद्दलचा प्रतिज्ञापत्रात घोळ स्पष्ट झाला आहे. 
२१ डिसेंबर २०१३ ला संजयला त्याच्या पत्नीच्या आजारपणाच्या कारणावरुन ३० दिवसांचा पॅरोल मंजूर झाल्यावर तो ३० दिवस आणखी वाढवून संजय २१ मार्चला जेलमध्ये हजर होणे अपेक्षित असताना तो २२ मार्चला हजर झाला हे प्रतिज्ञापत्राच स्पष्ट झालं आहे.


नंतर त्याच्या मुलीच्या आजारपणावरुन संजयला २६ आॅगस्ट २०१५ पॅरोल मिळाला तेव्हा तो जेलमध्ये २५ सप्टेंबर २०१५ ला जेलमध्ये हजर राहणं अपेक्षित असताना २६ सप्टेंबरला हजर झाला हे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट झालंय.


१ ऑक्टोबर २०१३ ला १४ दिवसांचा फरलो मिळाला त्यानंतर पुन्हा १४ दिवसांची मुदतवाढ मिेळाल्यानंतर २९ आॅक्टोबरला जेलमध्ये हजर राहणे अपेक्षित असताना संजय ३० तारखेला जेलमध्ये हजर झाला. 


- जानेवारी २०१५ ला देखील दोन उशीराच संजय जेलमध्ये हजर झाल्याचं प्रतिज्ञापत्रात उघड झाले आहे. असं असूनही संजयवर कोणताही कारवाई करण्यात आली नसल्याची तक्रार याचिकाकर्ते प्रदीप भालेकर यांनी केली आहे.