मुंबई : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 186वी जयंती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तळागाळातल्या समाजापर्यंत ज्ञानगंगा पोहोचावी म्हणून सावित्रीबाई फुलेंनी, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत हिरीरीनं शिक्षण प्रचाराचं कार्य केलं. त्यासाठी प्रसंगी त्यांनी अतोनात हालअपेष्टाही सोसल्या.


समाजाच्या उद्धारासाठी अविरत झटणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या असमान्य कार्याची दखल गुगलनंही घेतलीय. गुगलनं या क्रांतीज्योतीचं डुडल तयार करुन, त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.