मुंबई चोरुन आणलेले कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे जप्त
चोरट्या मार्गाने मुंबई आणलेले कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे जप्त करण्यात आले आहे. जवळपास 50 बॅगांमध्ये सोने, चांदी आणि हिरे होते.
मुंबई : चोरट्या मार्गाने मुंबई आणलेले कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे जप्त करण्यात आले आहे. जवळपास 50 बॅगांमध्ये सोने, चांदी आणि हिरे होते.
या सोने आणि हिऱ्यांचा जकात भरण्यात आलेला नव्हता. जकात चुकवून चोरट्या मार्गाने मुंबई सेंट्रलवर हे सोने, चांदी आणि हिरे उतरविण्यात आले होते. मुंबई महापालिकेच्या जकात विभागाने बुधवारी तब्बल 50 बॅगा जप्त केल्या. हा जप्त करण्यात आलेला माल कोट्यवधी रुपयांचा असल्याचा आहे.
बुधवारी आलेल्या मालाची माहिती विधी समितीच्या अध्यक्षा उज्ज्वला मोडक यांनी दिली होती. त्याच्या आधारे हिरे, चांदी, सोन्याच्या या बॅगा ताब्यात घेण्यात आल्या. या बॅगा जकात चुकवून मुंबई सेंट्रल येथे आणण्यात आल्या होत्या, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.