मुंबई : शहीद भगतसिंग आणि सुखदेव यांच्यातला मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना कळेनासा झालाय. शहीद दिनानिमित्त मंत्रालयात शहीद भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांच पूजन करण्यात आले. मात्र, यातले भगतसिंग कोण, असा प्रश्न पडला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठेवण्यात आलेल्या प्रतिमांमध्ये सुखदेव यांच्याऐवजी भगतसिंग यांचाच फोटो वापरण्यात आला. त्यामुळे भगतसिंग कोण हे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना समजले नाही. चक्क भगतसिंग यांचे दोन फोटो लावले गेलेत.


२३ मार्चला भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना फाशी देण्यात आली होती. त्यांची पुण्यतिथी शहीद दिवस म्हणून साजरी केली जाते. शहीद दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आले. यामध्ये भगतसिंग यांचे दोन फोटो ठेवण्यात आले होते. त्यातील एका फोटोखाली सुखदेव असं नावदेखील लिहिण्यात आले होते.


आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र त्यांनादेखील हा फरक लक्षात आला नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी चौकशी करुन कारवाईचे आदेश दिलेत.