मुंबई :  एअर इंडियाने आमच्या खासदाराला फ्लाईटवर बॅन करण्याचे निर्देश देण्यात आले त्याच तातडीने एअर इंडियाने त्यांच्या सर्व्हिस सुधारण्याचे निर्देश दिले असते तर बरं झाले असतं, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एअर इंडियाला धारेवर धरले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवी गायकवाड यांच्या कृत्याचं शिवसेना पक्ष म्हणून कधीही समर्थन करणार नाही,  पण आमच्या खासदारावर ही वेळ का आली याचा ही तपास झाला पाहिजे, असेही राऊत म्हणाले. 
 
कोणालाही मारणं हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम नसू शकतो मात्र जिथे गरज आहे तिथे शिवसेना हात नक्कीच उचलणार असे शिवसेनाच्या आक्रमतेच्या भूमिकेचे राऊत यांनी समर्थन केले आहे. 


हा प्रश्न एकट्या खासदाराचा नाही तर सर्वसामान्य जनतेचा सुद्धा आहे. एअर इंडियाच्या सर्वीसमुळे हजारो प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावं लागतं आहे, असे राऊत म्हणाले. 


मुंबई, दिल्ली सारख्या अनेक एअरपोर्ट वर प्रवाशांची लूट होते तेव्हा कुठे जाते यांची तत्परता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 


पक्ष म्हणून कारवाई करण्यापेक्षा कायदेशीर कारवाई जी व्हायची ती होईल, असेही राऊत यांनी म्हटले आहे.