मुंबई : कर्जमाफीचा तिढा सुटत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेच्या मंत्र्यासह दिल्लीत जाणार आहेत. दिल्लीत गेल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मात्र मोदींची भेट होणार की नाही याची अनिश्चितता आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट होईल, असे सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री आज कर्जमुक्तीची मागणीसाठी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राज्याचे अर्थसंकल्पयी अधिवेशन सुरु आहे. मात्र, गेले दोन आठवडे सभागृहाचे कामकाज विरोधकांमुळे नीट होऊ शकलेले नाही. शिवसेना कर्जमाफीसाठी अधिकच आक्रमक झाल्याने राज्य सरकारची कोंडी झाली आहे. उद्या राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जमाफीवरून जी कोंडी झाली आहे ती फोडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न आहे.


दरम्यान, शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीवर निवदेन देताना मांडली. जर सर्व कर्जमाफ केले तर त्याचा राज्यातील विकासावर परिणाम होईल. निधी अभावी विकासकामे होणार नाही, असे मत मुख्यमंत्र्यांनी मांडले. मुख्यमंत्र्यांच्या निवदेनानंतर विरोधक आक्रमक आहेत.


यावर शिवसेनेने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले, मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या त्याचा आदर करतो. राज्याने मदत केली तरी शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. आम्ही  रस्त्यावर उतरण्यासाठी कटीबद्ध आहोत. पंतप्रधान, कृषीमंत्र्यांना उद्यापर्यंत भेटा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली. त्यामुळे आज मुख्यमंत्री दिल्लीत जात असल्याचे सांगण्यात येत आहे.


कर्जमाफीत राज्याचा जो हिस्सा असेल त्याची तरतुद अर्थसंकल्पात असावी. आमच्या पक्षप्रमुखांची ही अपेक्षा आहे. कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत शिवसेनेची भूमिका ठाम आहे. अर्थसंकल्पात राज्याची भूमिका स्पष्ट करावी, ती झाली नाही तर आमची भूमिका ठाम आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या मागे ठाम पणे उभे आहोत, असे शिवसेना आमदार अनिल कदम यांनी म्हटले आहे.