कुलभूषण जाधवबाबत शिवसेना आक्रमक
कुलभूषण जाधव यांच्याबाबतीत फक्त भावना व्यक्त करून चालणार नाही, पाकिस्तानला तोंडी किंवा कागदी इशारे देऊनही चालणार नाही. आता थेट कारवाई करुन दाखवावी लागेल.
दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई : कुलभूषण जाधव यांच्याबाबतीत फक्त भावना व्यक्त करून चालणार नाही, पाकिस्तानला तोंडी किंवा कागदी इशारे देऊनही चालणार नाही. आता थेट कारवाई करुन दाखवावी लागेल.
जाधव यांना लवकरात लवकर भारतात परत आणावं लागेल अशी परखड भूमिका उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलीय. 'मातोश्री' एका कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांपुढे त्यांनी ही भूमिका मांडली.
शिवसेना-भाजप युतीचे ‘व्हेंटिलेटर’वर असलेले संबंध सध्या ‘कासव’गतीने पूर्वपदावर येत आहेत, असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारलेल्या मराठी कलावंतांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज 'मातोश्री'सदिच्छा भेट घेतली. उद्धव यांनी या पुरस्कार विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत मार्मिक भाष्य केले. ते म्हणालेत, व्हेंटिलेटर'वर असलेली युती 'कासवा'च्या गतीनं पूर्वपदावर येत आहे. युती ‘कासव’गतीने पुढे जातेय, असे ते म्हणाले. उद्धव यांच्या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला.