मुंबई :  शिवसेना-भाजप युतीचे ‘व्हेंटिलेटर’वर असलेले संबंध सध्या ‘कासव’गतीने पूर्वपदावर येत आहेत, असे सूचक वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बाजी मारलेल्या मराठी कलावंतांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज 'मातोश्री'सदिच्छा भेट घेतली. उद्धव यांनी या पुरस्कार विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत मार्मिक भाष्य केले. ते म्हणालेत, व्हेंटिलेटर'वर असलेली युती 'कासवा'च्या गतीनं पूर्वपदावर येत आहे. युती ‘कासव’गतीने पुढे जातेय, असे ते म्हणाले. उद्धव यांच्या उत्तराने उपस्थितांमध्ये हशा पिकला.


एप्रिल महिन्या अखेरीस राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांचा शिवसेना चित्रपट सेनेच्यावतीने मुंबईत फेस्टिव्हल आयोजित करण्याची संकल्पना यावेळी उद्धव यांनी मांडली. पण या सदिच्छा भेटीच्या कार्यक्रमात लक्षवेधी ठरला तो उद्धव यांना विचारण्यात आलेला शिवसेना-भाजप संबंधांवरचा प्रश्न.


दरम्यान, तसेच कुलभूषण जाधव यांच्याबाबत ‘फक्त पत्रव्यवहार करून काही होणार नाही, पाकिस्तानला कायमचा धडा शिकवला पाहिजे’, अशी कडक भूमिका त्यांनी यावेळी मांडली.