मुंबई :  मुंबईत कोणाला किती जागा मिळणार यावर सर्व जण आज काल तज्ज्ञासारखे अंदाज वर्तवत आहेत. आता सोशल मीडियावर शिवसेनेचा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचा अंदाज फिरत आहे. हा शिवसेना अंदाज आहे का याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा मुंबई महापालिकेसाठी विक्रमी ५५.२८ टक्के मतदान झाले. गेल्या २०१२ च्या तुलनेत मतदार कमी झाले असल्यामुळेही ही टक्केवारी वाढल्याचे समोर आले आहे. पण मतदान वाढले हे नक्की. गेल्या निवडणुकीत एकूण १ कोटी २ लाख मतदार होते. यावेळी सुमारे ९२ लाख मतदार होते. त्यामुळे १० लाख मतदार यादीतून वगळ्यात आले होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली. तसेच एक ते दीड लाख मतदारांनी वाढीव मतदान केले. 


यानुसार हे वाढीव मतदान कोणाला झाले, याचा फायदा कोणाला होणार यावरून अंदाज बांधला जात आहे. 


शिवसेनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार शिवसेना स्वबळावर सत्तेपर्यंत पोहोचू  शकणार आहे.  शिवसेनेने एकूण २२७ जागांपैकी २०२ जागांचा अंदाज व्यक्त केल्याचे म्हटले जात आहे.  २०२ पैकी एकूण ११० जागांवर विजय मिळू शकतो असा अंदाज शिवसेनेने व्यक्त केला आहे. 


मुंबईत स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी ११४ नगरसेवकांची गरज आहे. 


शिवसेनेच्या अंदाजानुसार मुंबई महापालिकेतील मिळणाऱ्या जागा :


उत्तर पूर्व मुंबई– (मुलुंड, भांडुप, विक्रोळी) – १९ पैकी १० 


मध्य पूर्व मुंबई (सायन, देवनार, चेंबुर – १८ पैकी ८ 


मध्य पश्चिम मुंबई (कुर्ला, कलिना, चांदिवली, सांताक्रुझ) – २१ पैकी १२ 


पश्चिम मुंबई (वांद्रे, वर्सोवा, अंधेरी) –  ३६ पैकी १८ 


उत्तर पश्चिम मुंबई (गोरेगाव, जोगेश्वरी) –  २१ पैकी १६ 


उत्तर मुंबई (दहिसर, बोरीवली) – १६ पैकी १० 


दक्षिण मुंबई -(मलबार हिल, गिरगाव, कुलाबा, भायखळा) –  १८ पैकी ८


मध्य दक्षिण मुंबई -(शिवडी, लालबाग, वरळी) –  १६ पैकी ११


मध्य मुंबई – (वडाळा, धारावी, माहीम/दादर) – १८ पैकी ९ 


पूर्व-पश्चिम मुंबई -(घाटकोप पूर्व/पश्चिम, गोवंडी – १९ पैकी ८ 



२०२ पैकी ११० जागा आपणच जिंकू असा अंदाज शिवसेनेला आहे. राहिलेल्या २५ जागांचा अंदाज शिवसेनेला बांधता आला नाही.