खांदेपालटाचा निर्णय योग्यवेळी होईल : उद्धव ठाकरे
शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात येणाऱ्या वृत्ताचे खंडन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुंबई : शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून वगळण्यात येणाऱ्या वृत्ताचे खंडन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. योग्यवेळी खांदेपालट करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे संकेत उद्धव यांनी यावेळी दिलेत.
शिवसेना मंत्री आणि आमदारांची यांची बैठक मातोश्रीवर झाली. यावेळी आमदारांनी आपल्या समस्या मांडल्या. आमदारांनी आपली बाजू मांडली आहे. मात्र, सध्यातरी कोणत्याही मंत्र्यांचा बदल होणार नाही, मीडियात वृत्त आले म्हणजे बदल होत नाही, योग्यवेळी बदल करु, असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिलेत. त्यामुळे सध्यातरी ज्येष्ठ मंत्र्याना अभय मिळाल्याने आहे.
आमदारांची बाजू समजून घेण्यात आली आहे. त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. दरम्यान, ज्येष्ठ मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने शिवसेना मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळ आजच्या बैठकीकडे लक्ष होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा यूटन मारला आणि ज्येष्ठ मंत्र्यांना अभय दिलेय.