शिवसेनेचे आजी-माजी 4 महापौर, नवे चेहरे मुंबई महानगरपालिकेत
पालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल लागेल आहे. शिवसेनेने प्रथम स्थान आबाधित राखताना भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे शिवसेनेला एकहाती सत्ता स्थापन करणे अवघड झाले आहे. शिवसेनेचे आजी-माजी 4 महापौर, नवे चेहरे मुंबई महानगरपालिकेत निवडणून गेलेत.
मुंबई : पालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल लागेल आहे. शिवसेनेने प्रथम स्थान आबाधित राखताना भाजपने जोरदार मुसंडी मारली. त्यामुळे शिवसेनेला एकहाती सत्ता स्थापन करणे अवघड झाले आहे. शिवसेनेचे आजी-माजी 4 महापौर, नवे चेहरे मुंबई महानगरपालिकेत निवडणून गेलेत.
शिवसेनेने स्वबळावर आणि पक्षातल्या नवीन चेहऱ्यांच्या बळावर ही कमाल केली. शिवसेनेकडून विजयी झालेले अनेक उमेदवार यंदा प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आजी माजी महापौर विजयी झालेत. यात श्रद्धा जाधव, मिलिंद वैद, विशाखा राऊत तर विद्यामान स्नेहल आंबेकर यांचा समावेश आहे.
मुंबईत प्रभाग क्रमांक २०४ मधून शिवसेनेचे विजयी उमेदवार अनिल कोकीळ हे पहिल्यांदाच नगरसेवक झालेत. महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वी ते शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. प्रभाग क्रमांक २०५ मधून निवडून आलेले दत्ता पोंगडे यांनीही या पूर्वी शाखाप्रमुखाची जबाबदारी पार पाडली असून, आता तेही नगरसेवक म्हणून प्रथमच निवडून आले आहेत.
महिला उपविभाग संघटक म्हणून काम पाहणाऱ्या सिंधू मसूरकर याही यंदा प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या नाना आंबोले यांच्या पत्नी तेजस्विनी आंबोले यांना लालबागमधून पराभूत करून मसूरकर निवडून आल्या आहेत. शिवसैनिक असलेले अॅड. संतोष खरात हेही यावेळी प्रभाग क्रमांक १९५ मधून प्रभागातल्या इतर पक्षांच्या उमेदवारांना धूळ चारत ते यंदा प्रथमच नगसेवक म्हणून निवडून आले आहेत.