मुंबईच्या जागा-वाटपाबाबत आज पहिली बैठक
भाजप-शिवसेनामध्ये मुंबईच्या जागा वाटपबाबत आज पहिली बैठक होणार आहे. मुंबईतबाबतची हि पहिली आणि प्राथमिक बैठक असेल.
मुंबई : भाजप-शिवसेनामध्ये मुंबईच्या जागा वाटपबाबत आज पहिली बैठक होणार आहे. मुंबईतबाबतची हि पहिली आणि प्राथमिक बैठक असेल.
भाजप कडून आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता हे चर्चा करतील.
तर शिवसेना कडून सुभाष देआई, अनिल देसाई आणि अनिल परब या बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत सकारात्मक बोलणी सुरु आहेत असे जाहीर प्रतिपादन केले होते.
भाजप-शिवसेना युतीची चर्चा आणि निर्णय पक्षाचे पदाधिकारी घेतील असे सष्ट करीत कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.