मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये भाजपला आधी 60 जागा देऊ केलेल्या शिवसेनेनं आता 80 ते 90 जागांचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या फॉर्म्यूलाबाबत आता शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये चर्चा न होता थेट मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.


भाजपनं दिलेला 114 जागांचा प्रस्ताव शिवसेनेनं फेटाळून लावला होता आणि भाजपला फक्त 60 जागा देऊ केल्या होत्या. शिवसेनेच्या या ऑफरमुळे भाजपमध्ये मात्र नाराजी होती. यानंतर भाजपची मुंबईची ताकद बघता 60 जागाही जास्त आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनीही भाजपला डिवचलं होतं. आता मात्र पुन्हा एकदा दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.