निवडणुकीआधी शिवसेना-मनसेमध्ये वादाची पहिली ठिणगी
मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेना आणि मनसेमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे.
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिवसेना आणि मनसेमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली आहे. मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्या कार्य अहवालात बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरेंचा फोटो छापण्यात आला आहे. या फोटोवर दादरमधल्या शिवसैनिकांनी आक्षेप घेतला आहे.
या कार्य अहवालाविरोधात शिवसैनिकांनी निवडणूक आयोग आणि दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कारवाई झाली नाही तर वाद पेटण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे. बाळासाहेब आणि मीनाताईंचा फोटो छापून जाधव मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असा आरोपही शिवसैनिकांनी केला आहे.