भाजपनंतर आता शिवसेनेचंही गुजराती प्रेम
आज राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यासाठी घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत.
मुंबई : आज राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यासाठी घाटकोपरमध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. त्यासाठीची पोस्टर्स मात्र गुजरातीत लावण्यात आली आहेत.
गृहनिर्माण धोरणातून प्रामुख्यानं जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात मोठ्या घोषणा अपेक्षित आहेत. पण या सर्वाला असणारी निवडणूकीची पार्श्वभूमी बघता सेनेकडूनही गुजाराती मतदारांना भूरळ घालण्याचा प्रयत्न होतोय हेच या पोस्टरवरून सिद्ध होतं आहे.
शिवसेनेच्या या पोस्टरबाजीवर मनसेनं जोरदार हल्लाबोल केला आहे. पालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपकडून विशिष्ट समाजाच्या मतांसाठी लांगुलचालन सुरु असल्याची टीका मनसेचे पालिकेतील गटनेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केली आहे.